
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाच्या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. जिल्ह्यात उपलब्ध पाच हजार २९६ जागांसाठी दाखल अर्जांची संख्या १५ हजारांहून अधिक झाली आहे. शिक्षण विभागाने नोंदणीस मुदतवाढीचा निर्णय दिला असून, सुधारित वेळापत्रकानुसार रविवार (ता. २)पर्यंत नोंदणी करता येईल.