
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षे (टीईटी)च्या पेपर क्रमांक एक आणि दोनची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यासंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी सोमवार (ता. १६)पर्यंत मुदत दिली. राज्यभरात १० नोव्हेंबरला टीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक आणि दोनबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे.