
नाशिक : राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीनेदेखील भाडेवाढीची कमाल मर्यादा वाढवून बस भाडेवाढीची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या परिवहन आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून २०० सीएनजी व ५० अशा एकूण २५० बस चालविल्या जातात.