
नाशिक : एड्सबाधित व्यक्तीला आजही समाजात वावरताना सामाजिक कुंचबणेला सामोरे जावे लागते. अनेकांना तर कौटुंबिक- संसारिक सुखापासून दुरावा सहन करावा लागतो. परंतु असे असतानाही नाशिकच्या एआरटी सेंटरने गेल्या वर्षभरात समुपदेशनाच्या माध्यमातून एड्सबाधित ३० जोडप्यांचे विवाह लावून दिले आहेत. विशेषतः आजही जाती-पातीला कवटाळून बसलेल्या समाजात ही बाब सुखद असली तरी अजूनही अनेकजण या बुरसटलेल्या विचारांमुळे स्वतःचा संसार थाटू शकलेले नाहीत, हेही वास्तव आहे.