

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे राजीनामा सादर केला आहे. तो तत्काळ मंजूर करावा, यासाठी नांदगाव परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत ठिय्या मांडला. दरम्यान, प्रशासकीय कारवाईनुसार त्यांचा राजीनामा मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी ठिय्या सोडला. (delegation of Nandgaon sent resignation of dr Rohan Borse to district hospital for immediate approval )