.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : महापालिकेत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात सोमवारी (ता. २) शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत साडेनऊशे कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शहरातील आमदार व सर्व पक्ष्यांच्या लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीर भूसंपादनासंदर्भात तोंडावर बोट ठेवल्याने नाराजी व्यक्त केली.
भूसंपादनाचे ५५ कोटी रुपयांचे प्रस्तावांचे धनादेश विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या स्वाक्षरीने मंजूर झाले असताना आयुक्तांनी अनभिज्ञता दाखविताना यासंदर्भात तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले. (Demand for action against culprits in case of land acquisition)