
नाशिक : शहरातील बहुतांश स्वच्छतागृहे पंचवीस ते तीस वर्षे जुने असून जीर्णावस्थेत आहे. त्या सर्व स्वच्छतागृहांच्या जागी नवीन निर्मिती करण्याबरोबरच शहरात नवीन जागांचा शोध घेऊन उभारले जाणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरदेखील आठ प्रमुख रस्त्यांवर नवीन शौचालयांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. शहरात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे.