
नाशिक : कडाक्याची थंडी पडलेली असताना, रविवारी (ता.२२) सकाळी शहरभर दाट धुक्याची दुलई पसरली होती. यामुळे अनेक भागांमध्ये सकाळी नऊपर्यंत अंधारमय वातावरण होते. दृश्यमानतेत कमालीची घट झाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. दिवसभर काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिले. धुक्यामुळे किमान तापमानात वाढ नोंदविली असून, १४ अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे.