Deola-Chandwad Assembly Constituency : चांदवडमध्ये भाजपला फटका; महाविकास आघाडीची सरशी !

Assembly Constituency : दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीचा नुकताच निकाल लागला.
Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagare
Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagareesakal

Deola-Chandwad Assembly Constituency : दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी बाजी मारली. चांदवड - देवळा हे प्रमुख कांदा उत्पादक तालुके असताना देखील येथून आमदार डॉ. राहुल आहेरांच्या नेतृत्वाखाली भारती पवार यांना भास्कर भगरेंच्या तुलनेत जास्त मते मिळाल्याने इथे प्रस्थापित आमदारांनी बाजी मारली अस चित्र निर्माण झालं. ( Constituency maha vikas aghadi win )

मात्र दुसऱ्या बाजूला फक्त चांदवड तालुक्याचा विचार केला तर इथे महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीची सरशी झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झाले. दिंडोरी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कांद्याचा कड केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना रडवणार असा एक सूर होता. मात्र राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यापुढे कांदा प्रश्न मागे पडेल या आत्मविश्वासाच्या जोरावर भाजपने ही निवडणूक लढवली. दुसरीकडे महाविकास आघाडीने कांदा प्रश्न शेवटपर्यंत लावून धरत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्यात चुरशीची केली.

निकाल लागला आणि कांद्याने भाजपाला धडा शिकवला असा सूर सर्वत्र असताना चांदवडबाबत मात्र आमदार डॉ. राहुल आहेरांचे नेतृत्व सरस ठरले अश्या चर्चा रंगल्या. चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचा विचार करता डॉ. भारती पवार यांना १६ हजार ७४७ मतांची आघाडी देत डॉ. राहुल आहेर आणि भाजप मित्रपक्षांनी दिलासा दिल्याचे चित्र आहे. मात्र फक्त चांदवड तालुक्याचा विचार केला तर महाविकास आघाडीचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, संजय जाधव, नितीन आहेर आदी मित्र पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भाजपाच्या रथाला ब्रेक लावण्यात यश मिळवलं.

चांदवड तालुक्यातून भास्कर भगरे यांना ५६,३६४ मते मिळाली. जी भारती पवार यांच्या ५२२७३ मतापेक्षा ४०९१ मतांनी जास्त आहेत. शिवाय डमी उमेदवार बाबू भगरे यांना चांदवड तालुक्यातून ७९०६ मिळाली आहे. जी भास्कर भगरे यांची मते असल्याची लोकभावना आहे. अशाप्रकारे अधिकृत ४ तर बाबू भगरे यांची मते मिळवली तर ११९९७ मतांनी भाजपाला पिछाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेचे कल रचले जात असताना महायुतीला चांदवड तालुक्यातून मिळालेला सेट बॅक आत्मपरीक्षण करायला लावणारा तर आमदार डॉ. राहूल आहेर यांना विचार करायला लावणार आहे. (latest marathi news)

Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagare
Yeola Assembly Constituency : स्थानिक नेत्यांची वज्रमुठ, भुजबळांचा संयम अन्‌ जनतेचा रोष ठरला निर्णायक!

भास्कर भगरे यांच्या विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. शिवाय चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादकांचा रोष मतदानाच्या रूपाने प्रकर्षाने दिसला. जो आगामी विधानसभा निवडणुकांत दिसू द्यायचा नसेल तर विधानसभा निवडणुकीपूर्वी कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक विचार करावा लागेल हा धडाही भाजपला मिळाला.

गणेश निंबाळकरांच्या शांततेचा अर्थ काय ?

दिंडोरी मतदार संघाची निवडणूक सुरू होण्याआधीच कांदा निर्यात बंदी आणि एकूणच शेती प्रश्नावर प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर विविध आंदोलनांच्या केंद्रस्थानी राहिले. शिवाय शरद पवार यांनी देखील कांदा निर्यातबंदी विरोधात केलेल्या आंदोलनासाठी चांदवड निवडले. महाविकास आघाडीला या आंदोलनाचा पुरेपूर फायदा झाल्याचं चित्र चांदवडच्या आकडेवारीत तरी स्पष्ट आहे.

तत्पूर्वी निवडणुकीत कांद्याचा कड भोवणार इथपर्यंत राजकीय वातावरण येऊन ठेपले असताना गणेश निंबाळकर यांचा आक्रमकपणा कमी होताना दिसला. या संदिग्ध भूमिकेबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा महाविकास आघाडीकडून माझ्याबद्दल कुठलाही समन्वय साधला गेला नसल्याचे सांगितले. हा समन्वय साधला गेला असता तर चित्र आणखी सकारात्मक असते असे त्यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखवले.

Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagare
Nawapur Assembly Constituency : काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com