esakal | Nashik : उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांना उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

nashiik

Nashik : उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे यांना उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांना अ‍ॅड. बी. डी. हंबर्डे समाजाभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार - २०२१ नुकताच जाहीर झालेला आहे. पर्यावरणपुरक आणि सामाजिक कार्याची दखल घेत २३ ऑगस्ट २०२१ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांना आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने अ‍ॅड. बी. डी. हंबर्डे समाजाभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. दरवर्षी संस्थेचे संस्थापक कै. अ‍ॅड बन्सीधर धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

उच्च शिक्षण, संशाेधन, प्रकाशन, अभ्यासपूरक बाबी आणि सोबतच समाजकार्यात उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षकांची पुरस्कारासाठी दरवर्षी निवड केली जाते. देशभरातून निवडलेल्या १४ गुणवंत प्राध्यापकांतून संस्थेचे अध्यक्ष इंजि. किशोरनाना हंबर्डे, प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी प्रा. ज्ञानोबा ढगे यांची निवड करून त्यांना पुरस्कार जाहीर केला.

हेही वाचा: कपाशीच्या शेतात मासे पळविण्यासाठी एकच धूम...;पाहा व्हिडिओ

प्रा. ज्ञानोबा ढगे यांच्या सामाजिक, पर्यावरण विषयक, जलसंधारण विषयक, रक्तदान शिबिरे, झेंडू फुले अभियान, एक मुल ३० झाडे अभियान,तसेच निसर्गाची शाळा, विद्यार्थी आणि समाज केंद्रित विविध उपक्रम आणि जनजागृती आदी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या निवडीबदल उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकरावजी बोरस्ते, सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, उपसभापती श्री. राघो आहिरे, चिटणीस डॉ.सुनील ढिकले, निफाड तालुका संचालक प्रल्हाद दादा गडाख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, उल्हासराव मोरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, आदींनी अभिनंदन केले आहे.

loading image
go to top