

इंदिरानगर : प्रभाग ३१ मधील वासननगर येथील सुमारे साडेसात एकरावरील गामणे मैदान आणि त्याच्या आत असलेल्या सुमारे ८०० मीटर जॉगिंग ट्रॅकची दैना झाली आहे. महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने या भागातील एकमेव क्रीडांगणाला अवकळा आली आहे. दररोज सकाळ, सायंकाळ येणाऱ्या शेकडो महिला आणि नागरिकांना व्यायामासाठी तर पोलिस आणि सैन्यभरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक- युवतींना शारीरिक परिक्षेच्या तयारीसाठीचे हे एकमेव मैदान आहे.