
वणी : महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी अशी त्रिगुणात्मीका स्वरुपी असलेल्या राजराजेश्वरी सप्तशृंगीमातेच्या धनुर्मासातील चौथ्या व शेवटच्या रविवारचा धनुर्मास तसेच आदिमायेचा शाकंभरी नवरात्रोत्सव व त्यात आदिमायेच्या सभामंडपात सुरु असलेला शाकंभरी याग अशा त्रीवेणी पर्वणीतील भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला.