
नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सुविधांची वानवा ‘सकाळ’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर त्यावर उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आरोग्य उपसंचालकांनी विभागाची सोमवारी (ता. ३०) बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, आरोग्य उपकेंद्रात ‘डायलिसिस’ सेंटर सुरू करण्यात येणार असून, सिन्नर येथून त्याची सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रांची संख्या ५९२ आहे, तर १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.