Nashik News : उदघाटनआधीच दुरुस्तीची वेळ; नामपूरच्या क्रीडा संकुलाची दुरवस्था

Nashik : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चून येथील मोराणे रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची उदघाटनापूर्वीच दुरवस्था झाल्याने फिटनेस टेंपलच अनफिट बनले आहे.
The sports complex built with an allocation of one and a half crore rupees along the Morane road here, the broken entrance in the second photo.
The sports complex built with an allocation of one and a half crore rupees along the Morane road here, the broken entrance in the second photo.esakal

Nashik News : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चून येथील मोराणे रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची उदघाटनापूर्वीच दुरवस्था झाल्याने फिटनेस टेंपलच अनफिट बनले आहे. क्रीडा संकुलाचे पत्रे, क्रीडा साहित्य भुरट्यांनी चोरून नेले आहे. संकुलाच्या दुरवस्थेमुळे आगामी काळात दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव क्रीडा विभागाच्या विचाराधीन असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (nashik Dilapidated sports complex of Nampur marathi news)

क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचा आठ वर्षापासून शासनाला विसर पडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडा विभागाचे अधिकारी यांनी याकामी लक्ष घालून लोकसभेच्या आचारसंहितेनंतर क्रीडासंकुल कार्यान्वित करण्याची मागणी युवा खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

उद्घाटनाआधीच चोरून नेलेले पत्रे, तुटलेले प्रवेशद्वार, क्रीडा संकुलात झालेला कचऱ्याचा ढिग, तळीरामांचा अड्डा, साहित्याची झालेली मोडतोड यामुळे तालुका क्रीडा संकुलाची अवस्था अक्षरशा कचराकुंडीसारखी झाली आहे. लोखंडी प्रवेशद्वार टवळखोरांनी तोडून टाकले आहे. क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनापासून सुरु झालेली श्रेयवादाची साडेसाती अद्याप नामपूरकरांचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे क्रीडा प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार असताना सटाण्यासाठी तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले. परंतु तेथे शासकीय जागा उपलब्ध न झाल्याने तत्कालीन आमदार उमाजी बोरसे यांनी माजी क्रिडामंत्री पद्माकर वळवी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सटाणा येथील क्रिडा संकुल नामपूर शहरात आणले. त्यासाठी नामपूर ग्रामपंचायतीने मोराणे रस्त्यालगत सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करून दिली.  (latest marathi news)

The sports complex built with an allocation of one and a half crore rupees along the Morane road here, the broken entrance in the second photo.
Nashik News : उपनगर चौकात संतप्त जमावाकडून रास्तारोको; आक्षेपार्ह पोस्टवरून वाद

१५ ऑगस्ट २०१४ ला माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्याने राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण आमदार झाल्या. त्यानंतर एका वर्षानंतर पुन्हा या कामाचे भूमिपूजन झाल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ निर्माण झाला होता. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन तातडीने क्रीडा संकुल कार्यान्वित करावे, अशी मागणी आदींनी केली आहे.

''आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे क्रिडा संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान आहे. येथील भग्नावस्थेत असलेल्या क्रिडा संकुलामुळे मन विषण्ण होते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेऊन क्रिडा संकुल सुरु करावे.''- अनिल सावंत, राष्ट्रीय हँडबालपटू, नामपूर

''क्रीडा विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्यात सर्वच तालुका क्रीडा संकुलांची अवस्था वाईट आहे. नामपूरचे क्रीडा संकुल शहरापासून लांब अंतरावर असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. ग्रामपंचायत प्रशासन, सेवाभावी संस्था, क्रीडा संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्याची बाब विचाराधीन आहे.''- सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक

The sports complex built with an allocation of one and a half crore rupees along the Morane road here, the broken entrance in the second photo.
Nashik News : नाशिकच्या रस्त्यावर धावतेय ‘सोलर बाईक’; एका अवलियाचा यशस्वी प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com