Latest Marathi News | नाशिक : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

नाशिक : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात मंगळवार (ता. १६) रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान तीन भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून याची व मेरी येथील भूकंप मापक यंत्रात नोंद झाल्याची माहीती तहसलिदार पंकज पवार यांनी देत नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: जळगाव पोलिस नाशिक ‘रेंज’मध्ये तपासात अव्वल; 23 महिन्यांत 16 खुनांचा तपास

मंगळवार (ता. १६) रात्री ८. ५८ मीनटांच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी हातनोरे, निळवंडी, उमराळे बुद्रुक, तळेगाव, मडकीजांब, वणारवाडी, वणी, खेडगाव आदी परीसरातील भुकंपाचे धक्के जाणवले. त्यामूळे तालुक्यात काहीशे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांनी याबाबत मेरी प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांच्याशी मागितलेल्या माहितीनूसार

हेही वाचा: झाडे पडण्याचे सत्र थांबेना पुणे- नाशिक महामार्ग ः वाहनचालकांचा जीव टांगणीला

मंगळवार (ता.१६) रात्री 08.58 , 09.34 आणि 09.42 वाजता तीन भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत त्याची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेच्या पासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, व घाबरुन जावू नये असे आवाहन तहसिलदार पंकंज पवार यांनी केले आहे.

Web Title: Nashik Dindori Earthquake Shocks Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..