Dindori Lok Sabha Constituency : विरोधातील नेते एकत्र आले, एकसंघ असलेले विलग झाले!

Dindori : राज्यातील राजकीय घडामोडी बदलल्यानंतर आता लोकसभेच्या प्रचारात विरोधात लढलेले नेते एकत्र दिसत असून, एकमेकांचा प्रचार करत आहेत, तर काही ठिकाणी एकमेकांसोबत असणारे विरोधात गेल्याचेही दिसून येत आहे.
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency esakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की, विधानसभा निवडणुका यात अनेक नेते एकमेकांच्या विरोधात लढले आणि एकमेकांशी भिडले देखील. ते आता कधीच एकत्र येणार नाहीत, असे कार्यकर्त्यांकडून छातीठोकपणे सांगितले जात होते. (Dindori Lok Sabha Constituency)

मात्र, राज्यातील राजकीय घडामोडी बदलल्यानंतर आता लोकसभेच्या प्रचारात विरोधात लढलेले नेते एकत्र दिसत असून, एकमेकांचा प्रचार करत आहेत, तर काही ठिकाणी एकमेकांसोबत असणारे विरोधात गेल्याचेही दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, आतापर्यंत निवडणुकांच्या तुलनेत झालेल्या यंदाची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. महायुतीतही तीन प्रमुख पक्ष, तर पक्ष असल्याने सध्या कोण कोणासोबत आहे याचा अंदाज कार्यकर्त्यांना बांधणे अवघड बनले आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांवर या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम झालेला आहे.

गत काही निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते आता लोकसभेच्या प्रचारात मांडीला मांडी लावून बसत आहेत. हा राजकीय दुरावा कमी होताना काही जवळचे नेते मात्र, लांब गेले असून ते विरोधकांच्या आखाड्यात दिसत आहेत.

हे नेते गेले दूर...

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास राष्ट्रवादी व ओबीसीचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाडचे आमदार दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार यांचे विश्वासू मात्र, आता ते शरद पवार यांच्यापासून लांब गेले आहेत. याउलट त्यांच्या विरोधात असणारे निफाडचे माजी आमदार अनिल कदम, येवला येथील आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार हे नेते पवार यांच्यासोबत काम करीत आहेत. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबाचे मनोमिलन

भुजबळ विरोधात सारे एकवटले

दरम्यान, येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात सारे विरोधक एकवटल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या निवडणुकीत भुजबळ यांच्यासोबत असणारे माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, संजय बनकर विरोधात दिसत आहेत.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, माजी सभापती संभाजी पवार यांनी डॉ. भारती पवार यांच्यासाठी काम केले होते. यंदा मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ते प्रचारात उतरले आहेत. पवार अन्‌ बनकर कायम विरोधात असणारे आता एकत्र दिसत आहेत.

निफाडमध्ये उलट चित्र

निफाडचे आमदार दिलीप बनकर गत निवडणुकीत डॉ. भारती पवार यांच्या विरोधात तर, माजी आमदार अनिल कदम डॉ. पवार यांच्यासाठी काम करीत होते. यंदा मात्र, आमदार बनकर डॉ. पवार यांच्यासाठी तर, कदम हे भास्कर भगरे यांच्यासाठी काम करतांना दिसत आहेत.

विरोधात लढलेले महाले डॉ. पवार यांच्या सोबत

गत निवडणुकीत भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धनराज महाले यांच्यात लढत झाली होती. मात्र, एकमेकांविरोधात लढणारे महाले आता भाजप उमेदवार डॉ. पवार यांच्यासाठी प्रचार करीत आहेत.

माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी गत निवडणुकीत भाजपसाठी प्रचार केला होता. मात्र, आता ते महाविकास आघाडीसाठी प्रचार करीत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ महालेंसाठी प्रचार करीत होते. आता ते डॉ. पवार यांच्या प्रचारात आहेत.

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Election : 2 मतदान केंद्रांचे अंतर सव्वादोनशे किलोमीटर; जळगाव आणि अहमदनगरच्या हद्दीपर्यंत विस्तार

कदम-आहेर एकमेकांविरोधात प्रचारात

गत लोकसभा निवडणुकीत चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि निफाडचे माजी आमदार अनिल कदम भाजप उमेदवार डॉ. पवार यांच्यासाठी संयुक्त प्रचार करीत होते. पिंपळगाव येथील पंतप्रधान मोदी यांच्या सभेची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर होती. मात्र, यंदा डॉ. आहेर भाजप उमेदवारासाठी तर, कदम महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांच्या प्रचारात दिसत आहेत.

सुरगाण्यातील गावित महाविकास आघाडीत

गत निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवारी करणारे माकपचे माजी आमदार जे. पी. गावित, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात आखाड्यात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र, गावित महाविकास आघाडीसोबत काम करतांना दिसत आहेत.

कळवण पवार कुटुंब एकत्र

गत निवडणुकीत कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार हे भाजप उमेदवार डॉ. पवार यांच्या विरोधात प्रचारात दिसत होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आमदार पवार हे डॉ. पवार यांच्यासाठी प्रचारात आहेत.

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : मंगळवारपासून दिंडोरीचा राजकीय आखाडा तापणार! महायुती, महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघात ठोकणार तळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com