Nashik News : दिव्यांग योगेश एका हाताने तयार करतोय कांदा चाळ

Nashik : वीरगाव (ता. बागलाण) येथील दिव्यांग योगेश बाळासाहेब बोरसे केवळ एका हाताने लिलाया कांदा चाळ बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
Yogesh Borse making onion chala with one hand in the field here.
Yogesh Borse making onion chala with one hand in the field here.esakal

Nashik News : वीरगाव (ता. बागलाण) येथील दिव्यांग योगेश बाळासाहेब बोरसे केवळ एका हाताने लिलाया कांदा चाळ बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. लहान वयातच वडीलांचे निधन झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीपासून योगेश बाहेरगावी जाऊन घराच्या लोखंडी खिडकी बनविणे व शेतकऱ्यांचे किरकोळ दुरुस्तीची कामे करु लागला. (Nashik disable Yogesh preparing onion net with one hand )

लोखंडी ॲंगल वापरून कांदा साठवणुकीसाठी जाळीदार चाळी बनविण्याचे काम योगेश करु लागला. हे काम करीत असताना योगेशच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात एक हात पुर्णतः निकामी झाला आहे. मात्र एक हात निकामी झाल्यानंतरही योगेशने आपल्या दिव्यांगाचा बाऊ न करता त्यावर मात करत पुन्हा कांदाचाळ बनवीत आहे.(latest marathi news)

Yogesh Borse making onion chala with one hand in the field here.
Nashik News : कचऱ्यातील प्लॅस्टिकमुळे गाईंचे आरोग्य धोक्यात

योगेशने कांदा चाळी बरोबर पोल्ट्री फार्म, जनावरांचे शेड बनविने, बंगल्याच्या लोखंडी खिडकी, नक्षीदार दरवाजा आदी कामे करीत असतो. उत्कृष्ट कामे शेतकऱ्यांना करून दिल्याने आजही योगेशकडे कांदा चाळी, पोल्ट्री फार्म आगाऊ बुकिंग आहेत. योगेश आजही झुंज देत मोठ्या जिद्दीने परिस्थितीला वाकवून ताठ मानेने आयुष्यासमोर उभा राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.

''वडीलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कमी वयातच येऊन पडली. त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिले. दर्जेदार काम दिल्यास आपणास स्वत:हून कामे मिळतात हे वडीलाकडून अनुभवले. आज एक हात निकामी असतानाही काम करण्याची उमेद आहे.''- योगेश बोरसे, कांदाचाळ कारागीर, विरगाव

Yogesh Borse making onion chala with one hand in the field here.
Nashik News : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे यात्रीनिवास धुळखात; बांधकामावर कोट्यवधी खर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com