
Nashik News : जिल्ह्याच्या पूर्व भागातील येवला, मालेगाव, नांदगाव यांसह सिन्नर तालुक्यात दुष्काळाची दाहकता असताना यंदा नाशिक तालुक्यालाही दुष्काळाची चाहूल लागली आहे. गंगापूर धरणालगतच्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झाले आहेत. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गोविंदपुरी गावात एका टॅंकरद्वारा पाणी पुरवठा सुरू आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा नाही. ()
तसेच, दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने भूगर्भातील पाणीपातळीही खालावत आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यातच, यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले होते. पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पुरेसा पाऊस नसल्याने राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी येवला, मालेगाव व सिन्नर हे तीन तालुके पूर्णतः दुष्काळी म्हणून घोषित केले आहेत. त्यानंतर पुन्हा ६० महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करत, असे एकूण ९३ महसूल मंडळांमध्ये सध्या दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक तालुक्यातील १० मंडळाचा समावेश आहे.
मुख्यतः जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाचे संकट गडद होत आहे. येथे दिवसेंदिवस टॅंकरची संख्या वाढत आहे. असे असतानाच नाशिक तालुक्यालाही दुष्काळाची झळ बसण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६९ टक्के पावसाची नोंद झाली असून यात नाशिक तालुक्यात ७५ टक्के पाऊस झाला आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता. (Latest Marathi News)
मात्र, एप्रिल अखेर तालुक्यातही दुष्काळाचा झळा जाणवू लागल्या आहेत. गत आठवड्यात तालुक्यात पहिल्या टॅंकरची मागणी नोंदविली गेली. त्यानुसार २४ एप्रिलपासून गोंविदपुरी येथे पहिला टॅंकर सुरू झाला आहे. या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू आहे. मात्र, काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गावात पाण्याचा स्त्रोत नसल्याने टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
''तालुक्यात गोविंदपुरी गावात एका टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. या गावातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आहे. हे गाव उंचावर असल्याने पाण्याचा स्त्रोत नाही. यासाठी गंगाम्हाळुंगी गावातील विहिरीतून पाइप लाईन आहे. परंतु, या विहिरीला पुरेसे पाणी नाही. यासाठी गंगापूर बॅक वॉटरमधून पाणी उचलून पाणी पुरवठा योजना सुरू करणार आहोत. ३० एप्रिलपर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल.''- विनोद देसले (उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद)
जूनअखेर सर्व योजना पूर्ण
नाशिक तालुक्यात जलजीवन मिशन अतंर्गत ५५ पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ३५ योजनांचे काम पूर्ण होऊन त्याव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मार्च अखेर ४५ योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ ३५ योजना सुरू झालेल्या आहेत. आता २० पैकी १४ पाणी पुरवठा अंतिम टप्प्यात आहेत. यादेखील लवकरच सुरू होतील. जूनअखेर सर्व योजना पूर्ण होतील, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.