नाशिक- पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी निगडित साखर कारखान्यांना राज्य सरकार दोन हजार कोटींची हमी देते. परंतु, अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६३५ कोटी रुपये देण्यास सरकार तयार नाही. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.