
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला असताना, नाशिक जिल्हा बँक त्यापासून वंचित राहिली. जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे १० हजार शिक्षकांचे प्रत्येक महिन्याला ८० कोटी रुपये जमा व्हायचे. त्यापासून बँक मुकली असून, राज्यातील १६ बँका आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. जिल्हा बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासकांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बँकेने ६३५ कोटींच्या ‘शेअर्स कॅपीटल’ची मागणी नाबार्डकडे केली आहे.