
नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची स्थिती सुधारण्यासाठी ६५० कोटींचे कर्ज राज्य सहकारी बॅंकेकडून उपलब्ध करून देण्यास शासनाने असमर्थता दर्शविल्यानंतर वसुलीसाठी जिल्हा बॅंक प्रशासन पुन्हा ‘अॅक्शन मोड’वर आले आहे. गेल्या वर्षी बॅंकेने राबविलेल्या नवीन सामोपचार योजनेत काहीसा बदल करत ती योजना पुन्हा शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. संबंधित योजनेला बॅंकेच्या वार्षिक सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. (District Central Cooperative Bank is again on action mode for debt recovery )