नाशिक- जिल्हा परिषद कार्यालयात दिव्यांग व्यक्तीस झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिस आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलैला होणार असून, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.