नाशिक- जिल्ह्यातील शासकीय व खासगी क्षेत्रातील बँकांमार्फत विविध योजनांसह शेतीकर्जाच्या मर्यादेत वाढ करीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५२ हजार ६०३ कोटींच्या पतआराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पत आराखड्यात तब्बल नऊ हजार ६४२ कोटींची वाढ झाली आहे.