Nashik : साथरोग रुग्णांचे अहवाल तयार करण्याचे आदेश; चीनच्या ‘एचपीएमव्ही’ विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क

Latest Nashik News : चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचपीएमव्ही) गुजरातमध्ये पोहोचल्याने नाशिकचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
HPMV virus
HPMV virusesakal
Updated on

नाशिक : चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचपीएमव्ही) गुजरातमध्ये पोहोचल्याने नाशिकचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी सर्व तालुका आरोग्याधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. तसेच सर्दी, खोकला यांसारख्या साथरोग आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. एचपीएमव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण बेंगळुरूत आढळल्यानंतर हा विषाणू गुजरातपर्यंत अर्थात नाशिकलगतच्या राज्यात पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com