Nashik Pre-Monsoon Rain : जिल्ह्याला मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा; गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये आठपट अधिक पाऊस

Nashik News : जिल्ह्यात मॉन्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असताना मॉन्सूनपूर्व पावसाने मात्र धुमाकूळ घातल्याचे दिसून आले.
Pre-Monsoon Rain
Pre-Monsoon Rainesakal

Nashik News : जिल्ह्यात मॉन्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असताना मॉन्सूनपूर्व पावसाने मात्र धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या दहा दिवसांत अवघे आठ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात अवघे ९० दिवसांत ७० टक्के पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात भीषण दुष्काळ जाणवला. (District hit by pre monsoon rains)

टँकरची संख्या झपाट्याने वाढली असून, चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. आता पावसाळा सुरू होण्याची वाट बघत असताना मॉन्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि दगडांसारख्या गारा पडल्यामुळे पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. उमराणे (ता. देवळा) येथे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर शेळ्या, मेंढ्या व जनावरेही मृत्युमुखी पडल्याचे समजते. प्रशासनातर्फे त्यांचा पंचनामा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येईल. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (latest marathi news)

Pre-Monsoon Rain
Monsson Trip : पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी ही ५ सर्वोत्तम निसर्गरम्य ठिकाणे; तुम्हाला घालतील भुरळ,नक्की पाहा

पावसाची सरासरी (मिलिमीटर)

तालुका........२०२४........२०२३

मालेगाव........४९.६ …....८.१

बागलाण........४१.१..........८.१

कळवण..........२२.१...........५.०

नांदगाव..........७०.९...........४.२

सुरगाणा..........४९.८............५.२

नाशिक...........४०.४............४.७

दिंडोरी.............३९.५............४.९

इगतपुरी...........७६.९...........६.१

पेठ...................३६.१...........१३.२

निफाड.............५९.३............६.६

सिन्नर..............७१.३............१०.५

येवला...............६२.५.............८.९

चांदवड.............९६.८..............४.४

त्र्यंबकेश्‍वर........४९.४.............२९.८

देवळाली.............७०.४.............१०.५

(सरासरी)..........५६.१................८.६

Pre-Monsoon Rain
Nashik Traffic News : द्वारका ते सारडा सर्कल वाहतूक कोंडी! लांबच्या लांब वाहनांच्या रांगा; अनेकांना मनस्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com