
नाशिक जिल्ह्यात मेडिकल दुकानावर महिन्यात लागणार सीसीटीव्ही
नाशिक : जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी, औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जारी केले. शेड्युल एक्स, एच व एच वन औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांसाठी हा आदेश सक्तीचा करण्यात आला आहे.
शेड्युल एक्स, एच व एच.1 औषधे व इन्हेलर विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांत सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावण्यात यावेत, जिल्हा औषध नियंत्रण विभागाने सर्व औषध विक्रेते दुकानादारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही पडताळणी करावी. असे आदेश आज (ता 23) पासून लागू करण्यात आले असून दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे, महिनाभरात दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे आदेश आहेत.
Web Title: Nashik District Medical Store Cctv Camera
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..