District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीची रविवारी बैठक

Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. ७) दुपारी तीनला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली आहे.
Dada Bhuse
Dada Bhuse esakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपताच पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. ७) दुपारी तीनला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. (District Planning Committee meeting on Sunday)

नवनिर्वाचित खासदारांची रविवारी पहिलीच बैठक असणार आहे. जिल्हा नियोजन समितीला जिल्हा वार्षिक योजनेतून जूनमध्ये ३३ टक्के निधी प्राप्त झाला आहे. सर्वसाधारण योजनांसाठी ८१३ कोटींपैकी २७० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

त्यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीने जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व इतर प्रादेशिक कार्यान्वयीन यंत्रणांना नियतव्यय कळविला आहे. जिल्हा परिषद व इतर विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण योजना, अनुसूचित जमाती घटक योजना व अनुसूचित जाती घटक योजनांसाठी निधी दिला जातो. (latest marathi news)

Dada Bhuse
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेची रविवारी वार्षिक सभा

त्यात सर्वसाधारण योजनेसाठी ८१३ कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जमाती घटक योजनेसाठी ३४९ कोटी व अनुसूचित जाती घटक योजनेसाठी शंभर कोटी रुपये नियतव्यय कळविला आहे.

त्यानुसार विभागांचे नियोजन सुरू झाले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवल्याने आचारसंहितेमुळे कामांना लागलेला ब्रेक आता निघणार आहे.

Dada Bhuse
Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com