नाशिक : मुस्लिम बांधवांचा सण ईद-ए-मिलाद यानिमित्ताने सोमवारी (ता. १६) जुलूस मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग बॅरिकेटींग करण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावेळी एका आठवड्यात आले आहेत. (police presence on procession route in city)