Lok Sabha Election Vote Counting: अंबड वेअर हाऊस परिसरात कडेकोट बंदोबस्त! लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

Nashik News : यावेळी परवानगी आणि प्राधिकार पत्र बाळगणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
Strong Security file photo
Strong Security file photoesakal

नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊस येथे होणार आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, परिसरात पाचशेहून अधिक सशस्त्र पोलीस तैनात असणार आहेत. यावेळी परवानगी आणि प्राधिकार पत्र बाळगणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. (Nashik Police system ready for Lok Sabha election vote counting)

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या २० मे रोजी मतदान झाले असून, येत्या मंगळवारी मतमोजणी होते आहे. मतमोजणी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या अखत्यारितील सातपूर, अंबड, एमआयडीसी पाेलीस चाैकी, इंदिरानगर, उपनगर, नाशिकराेड, देवळाली कॅम्प आणि पाेलीस मुख्यालयासह गुन्हेशाखा, अभियाेग कक्ष, आर्थिक गुन्हेशाखा, गुंडाविराेधी पथक, महिला सुरक्षा विभाग, टीएडब्लू, वाहतूक शाखा, विशेष शाखांचे पाेलिस निरीक्षक, अंमलदार, साध्या वेशातील पाेलीस स्ट्राँगरुमसह मतमाेजणी कक्ष, अंबड वेअर हाऊस येथे तैनात असणार आहेत.

स्ट्राँग रुमला खडा पहारा

२० मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडल्यानंतर व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट चोख बंदोबस्तात अंबड येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी २४×७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून सीआरपीएफ दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात आहेत. तसेच, स्ट्राँग रुमच्या सुरक्षेचा आढावा शहर पोलिसांकडून घेतला जात आहे. (latest marathi news)

Strong Security file photo
PM Modi Message: ध्यान संपलं... एक्झिट पोल जाहीर; PM मोदींचा देशाला उद्देशून संदेश

बंदोबस्त असा

- पोलीस आयुक्त -१

- उपायुक्त - २

- सहायक आयुक्त - ३

- पोलीस निरीक्षक -१५

- सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक -३३

- अंमलदार - २५५

- महिला अंमलदार - १००

- शीघ्रकृती दलाच्या तुकड्या - ३

- सीआरपीएफ - २

- एसआरपीएप - २

Strong Security file photo
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com