
येवला : पशुपालक वाढले, दुग्धविकास वाढला, जोडीला आजारही वाढले पण त्यातुलनेत पशू आरोग्य सेवा मात्र जेमतेमच आहे. जिल्ह्यात गाई, म्हशी, बैल आणि कुक्कुट पक्षांची संख्या कोटीवर पोहोचली आहे. त्या तुलनेत पशुआरोग्य सेवा कमकुवतच आहे. ग्रामीण भागातल्या अनेक मोठ्या गावातही शासकीय आरोग्य सेवेचा अभाव आहे. चार वर्षापूर्वी शासनाने फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याला बळकटी देत प्रत्येक तालुकास्तरावर हा उपक्रम राबवून पशुपालकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.