Nashik Division Graduate Constituency : 6 उमेदवारांची निवडणुकीतून माघार अन् 16 उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

Nashik Division Graduate Constituency : 6 उमेदवारांची निवडणुकीतून माघार अन् 16 उमेदवार रिंगणात

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष,

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : रूग्णालयात दरपत्रक लावणे बंधनकारक असताना 80 टक्के हॉस्पिटल मात्र अनभिज्ञच!

ॲड. सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे, संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील, धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी, जळगाव, अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9834874768 असा आहे.

हेही वाचा: Nashik News : बागलाण तालुक्यात कांदा लागवडीचे Record Break!

टॅग्स :Nashikelection