
सातपूर : नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्यात क्षेत्र वाढविण्यासाठी कृतिशील धोरणांवर भर देण्यात आला असून, त्यामुळे २०२४ ते २०२५ मध्ये एकूण निर्यातीने ११ हजार ८३७.७७ कोटींचा आकडा पार केला आहे. त्यात कृषी क्षेत्रातील कांदा १०२४ कोटी, द्राक्षे २२० कोटी, फार्मा क्षेत्र ५३०, ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुटे भाग ३७५, तर वाहन उद्योगाची ३३० कोटींची निर्यात करण्यात आली आहे. नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक व्ही. बी. सोने यांनी निर्यातीचा आढावा सादर केला.