

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून नियोजन करावे आणि त्यासाठी रेल्वे विभाग व राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली. नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या सभागृहात गुरुवारी (ता. १२) विभागीय आयुक्त डॉ. गेडाम आणि मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इती पांडे यांनी रेल्वेस्थानक पुनर्विकासाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.