
मालेगाव : कसमादेसह खानदेशमध्ये समाधानकारक पावसामुळे खरीपाबरोबरच आगामी रब्बी हंगामाची शाश्वती मिळाली आहे. त्यामुळे यंदा दीपोत्सव धुमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे आहेत. कच्च्या मालाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांच्या किमती स्थिर राहणार असतील असे उत्पादक व घाऊक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (This year price of firecrackers will remain stable)