फोटो : H34596
--
शहराच्या बाजारपेठेत गर्दीचा महापूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दिवाळीमुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. सिटीलिंक बसचा मार्ग बदलल्यामुळे रविवार कारंजा ते शालिमारदरम्यान होणारी कोंडी सुटण्यास काहीअंशी मदत झाली. मात्र खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहने अन् रिक्षामुळे काही ठिकाणी कोंडीची समस्या उद्भवत होती.
लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी पूजेच्या साहित्यासह दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांनी शालिमार, मेनरोड, रविवार कारंजाचा परिसर गाठला. त्यामुळे आठवडाभरापासून या परिसरामध्ये गर्दी कायम असली तरी, येत्या शनिवारी आणि रविवारी बाजारपेठेत गर्दीचीच शक्यता आहे.
रविवार कारंजा परिसरात लक्ष्मीपूजनासाठीचे साहित्य विक्रेत्यांकडे ग्राहकांची तोबा गर्दी होती. तर मेन रोडवर कपडे, शोभेच्या वस्तूंसह गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीने दुकाने भरली होती. शालिमार चौकाकडून मेन रोडकडे जाणारा रस्ता बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला होता. या रस्त्यावर फेरीवाले आणि हॉकर्सने कपड्यांची दुकाने थाटल्याने याठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली होती. सराफ बाजारातही सोने खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
---
११ नोव्हेंबरपर्यंत बदल
मुख्य बाजारपेठेतील गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिटी लिंक बसेसच्या मार्गात बदल करण्यात आहे. हे बदल येत्या बुधवारपर्यंत (ता. ११) राहतील, अशी अधिसूचनाच शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे.