नाशिककर निघणार पर्यटनाला

नाशिककर निघणार पर्यटनाला
Published on: 
एन्कर फोटो : B18076 दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पर्यटनाला उधाण देशांतर्गत आणि धार्मिक स्थळांना पर्यटकांची पहिली पसंती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : दिवाळी सणातील सलग सुट्या आल्याने नाशिककरांनी कुटूंबियांसमवेत पर्यटनाचे प्लॅनिंग केले आहे. रविवारी (ता.८) लक्ष्मीपूजन साजरे केल्यानंतर शहरवासीय पर्यटनासाठी रवाना होतील. पर्यटकांची यंदा रेल्वे आणि विमान प्रवासाला अधिक पसंती मिळते आहे. अंधाराकडून तेजाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला असून सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे. यंदाचा दिवाळी सणात सलग सुट्या लागून आल्यामुळे नाशिककरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे नाशिककरांनी कुटूंबियांसमवेत विविध ठिकाणी पर्यटनाचे बेत आखले आहेत. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता शहरवासीयांनी यंदा राज्यासह देशांतर्गतच पर्यटन स्थळांना पसंती दिली आहे. राज्यामध्ये अष्टविनायक, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, जेजुरी या प्रमुख धार्मिक स्थळांसोबत निसर्गरम्य कोकणची पर्यटनासाठी नाशिककरांनी निवड केली आहे. देशांतर्गत पर्यटनामध्ये माता वेष्णोदेवी, जम्मु-काश्‍मिर, राजस्थान, आसामसोबतच हरिद्वार-ऋषिकेश, गुजरात, गोवा या ठिकाणांकडे कल अधिक आहे. त्यासोबतच दक्षिणेकडे तामिळनाडू, चेन्नई व केरळ राज्यातही पर्यटकांची पसंती मिळते आहे. रविवारी (ता. ८) लक्ष्मीपूजन साजरे केल्यानंतर सोमवारी (ता. ९) नागरिक पर्यटनासाठी रवाना होणार आहेत. नाशिककरांनी पर्यटनाला जाण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल्ल असून तात्काळ तिकिटासाठी नाशिककरांचे प्रयत्न सुरु आहेत. ---चौकट विमान प्रवासाकडेही कल नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोतर्फे नवी दिल्लीसाठी सकाळ व रात्रीच्या सत्रात प्रत्येकी एक विमान सेवा आहे. या व्यतिरिक्त हैदराबाद, अहमदाबाद तसेच बंगळुरू या शहरांसाठी कंपनीची सेवा उपलब्ध आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने तिकिटांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पण तरीही नाशिककरांची विमान प्रवासाला पसंती मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.