
नाशिक : उमेदवारांची नावे निश्चित झाल्यावर आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे गुप्त पद्धतीने मतदान नोंदविले जाईल. शुक्रवार (ता. ८)पासून मंगळवार (ता. १९) या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने स्पष्ट केले. नाशिक पश्चिम मतदारसंघात ९१ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे मतदान आहे. (Door to door voting for Friday All processes will be completed within 19 november )