Nashik Adivasi Karigar Melava : शबरी घरकुल, वैयक्तिक लाभार्थ्यांना धनादेश : डॉ. भारती पवार

Nashik News : आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
Union Minister of State Dr. Bharti Pawar, Leena Bansod etc.
Union Minister of State Dr. Bharti Pawar, Leena Bansod etc. esakal

नाशिक : आदिवासी बांधवांची लोककला, संस्कृती व परंपरा सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी आदिवासी नृत्य समूहांची प्रकल्प अधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर नोंदणी करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे. शबरी घरकुल योजनेसह आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांना रविवारी (ता. १०) नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात धनादेश वितरित करण्यात आले. या वेळी डॉ. भारती पवार बोलत होत्या. (Nashik Adivasi Karigar Melava marathi news)

आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार माळी यांच्यासह भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव चलवादी, ट्रायफेडचे पदाधिकारी व आदिवासीबांधव उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आदिवासी बांधवांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम जनजातीय योजनेंतर्गत आत्तापर्यंत साधारण ९१ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ट्रायफेड संबंधित महाराष्ट्रातील २४ आदिवासी कारागिरांना कार्यक्रमात जीआय प्रमाणपत्र देण्यात आले.

आदिवासी बांधवांची कला, संस्कृती, पारंपरिक नृत्यांची परंपरा सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी यांनी तालुका व जिल्हा पातळीवर या नृत्य समूहांची नोंदणी करावी. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनास मंत्री डॉ. भारती पवार यांनी भेट दिली. आदिवासी नृत्य, नागपंचमीनिमित्त करण्यात येणारे तारपा नृत्य, होळी सणात सादर करण्यात येणारे आदिवासी डांगी नृत्य अशा विविध आदिवासी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. (Latest Marathi News)

Union Minister of State Dr. Bharti Pawar, Leena Bansod etc.
SAKAL Special: दिवसाची सुरवात करा सुंदर हास्याने..! 'सकाळ मैत्रीण मीट-अप’ मध्ये विविध हास्य क्लबच्या महिलांनी साधला संवाद

वैयक्तिक योजनेचे लाभार्थी

- विमल राजेंद्र बोके - दोन लाख रुपये

- तिलोत्तमा चंद्रकांत नाठे - तीन लाख रुपये

- प्रतिभा मुकुंदा भोये - दोन लाख रुपये

- जनार्दन बाळू हलकंदर - दहा लाख रुपये

वनधन केंद्रांना धनादेश वितरण

- जय कातकरी वनधन विकास केंद्र, हरसूल

- वनधन विकास केंद्र, रामवाडी, नांदगाव

- वनधन विकास केंद्र, करंजखेड

- वनधन विकास केंद्र, कोसवन, कळवण

- दिशा वनधन विकास केंद्र, कळवण

- कल्पतरू वनधन विकास केंद्र, मोहदान, पेठ

- प्रतीक्षा वनधन विकास केंद्र, अभोणा

Union Minister of State Dr. Bharti Pawar, Leena Bansod etc.
Nashik MRF Supercross: एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेत सी. डी. जिनान विजेता! हवेत झेपावणाऱ्या दुचाकींचा क्रीडाप्रेमींनी अनुभवला थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com