
Marathi Drama : नाशिकचे नाट्य लेखक दत्ता पाटील व दिग्दर्शक सचिन शिंदे या जोडीचे हंडाभर चांदण्या, दगड आणि माती, कलगीतुरा, तो राजहंस एक, या गाजलेल्या चार नाटकांचे सलग प्रयोग पुणे येथील श्रीराम लागू रंगअवकाश नाट्यगृहात ३० ऑगस्टला आणि १ सप्टेंबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात दुपारी २ ते रात्री १० असे सलग प्रयोग होणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व अभिनेते अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी सलग प्रयोगांचा ‘नाट्य चौफुला’ महोत्सव होत आहे. (drama plays on stage of Pune Thane )