जिल्ह्यातील लाभार्थींना घरपोच धान्य

जिल्ह्यातील लाभार्थींना घरपोच धान्य
Published on: 
NSK26H34619 नाशिक : म्हसरुळ येथील स्वस्त धान्य वितरण दुकानाला भेटीप्रसंगी लाभार्थींशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार पंकज पवार. ---------------- ३६-३ दिवाळीसाठी लाभार्थींना घरपोच धान्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला जनतेशी संवाद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दुष्काळाच्या सावटात प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, दिव्यांग बांधवांची दिवाळी आनंददायी व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चिंतेला संवादातून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने घरपोच धान्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य, दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुुक्रवारी (ता.६) म्हसरुळ येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३३ येथे भेट दिली. त्यानंतर दिंडोरी तालुक्यात पालखेड येथील कविता सोळसे या दिव्यांग लाभार्थीच्या घरी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सोळसेंना अन्नधान्याचे घरपोच वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार पंकज पवार, पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. --- शेतकऱ्यांशी संवादातून दिलासा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आणि चिंता जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निफाड तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाच हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे का, याची विचारणा करत त्यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने पाण्याचा काळजीपूर्वक व नियोजनपूर्वक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते. --- कोट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींना शंभर टक्के धान्य वाटप करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने यंत्रणा कार्य करत आहे. एखादा पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास त्याला शनिवार (ता.७) पर्यंत धान्य उपलब्ध करून दिले जाईल. यंत्रणांना तशा सूचना केल्या आहेत. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी. ----------------- फोटो क्रमांक : एच-34619

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.