NSK26H34700
नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना राजेंद्र शुक्ला, सुनील गायमुखे, एस. आर. जगताप, सी. डी. धनक, सुनंदा जरांडे, सरिता सोनवणे, रमेश शिसव आदी.
-------------
३६-४
अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिले २.४१ लाख
दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृतिशील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत २ लाख ४१ हजार रुपयांचा निधी संकलित केला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (ता.६) या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करत संबंधितांनी सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपला.
जिल्ह्यातील एकूण २२२ कृतिशील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, काही सदस्यांनी दुसऱ्यांदा आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून निधी संकलित करण्यात आला. कृतिशील संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शुक्ला यांनी सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून योगदानासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला नाशिक जिल्ह्यातील सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुनील गायमुखे, एस. आर. जगताप, सी. डी. धनक, सुनंदा जरांडे, सरिता सोनवणे, रमेश शिसव तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
---------