
निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : दरड कोसळल्यामुळे वाघेरा- हरसूल घाट बंद आहे. पर्यायी वाहतुकीसाठी दोन मार्ग सुचविले आहेत. दोन्ही मार्गांची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक तर आहेच मात्र १८ किलोमीटर अधिक प्रवास करावा लागत आहे. सदर मार्गांची स्थिती बघता एसटी महामंडळाने तर पहिल्याच दिवशी त्या मार्गावरील सर्व बस फेऱ्या बंद केल्या. इतर वाहनांमधून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे सदर पर्यायी दोन्ही मार्ग म्हणजे आजारापेक्षा इलाजच गंभीर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ( Due to closure of Waghera Ghat road journey of more than 2 thousand citizens is dangerous )