
Nashik Heavy Rain : शहरात विलंबाने आलेल्या पावसाची गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. गोदावरीला आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर आला आहे. तर दुसरीकडे पावसाने शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, यातून लहान-मोठे अपघात होत आहेत. दरम्यान, काही रस्त्यांवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने भगूर येथे दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. (due to continuous rain city roads is in bad condition )