
किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील विविध ठिकाणी रिक्त ६०२ जागांसाठी प्रसिद्ध केलेली भरती प्रक्रियेची जाहिरात एसईबीसी आरक्षणामुळे रद्द केली. तथापि, सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांना दिलासा आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सात हजार १३६ उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागाने जाहीर केली असून, त्यांना १० डिसेंबरपर्यंत बँकेची संपूर्ण माहिती देण्याची सूचना केली आहे.