
Nashik News : शहर परिसरात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. येत्या दिवसांतही अशाचप्रकारे पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे काझीगढी वासियांमध्ये धडकी भरली आहे. यंदाचा पावसाळा काय वृत्त घेऊन येतो, याची काळजी रहिवाशांना आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात दोन घरे कोसळल्यानंतर भीतीत वाढ झाली आहे. सध्याही येथील काठावरच्या अनेक घरांना तडे गेल्याची आढळून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात काझीगढीची माती ढासळण्याचे प्रकार घडतात. (Due to rains residents of Qazigarhi were in fear )