Nashik Vegetable Rate Hike : उन्हाच्या तडाख्यामुळे पाले, फळभाज्यांचे दर वधारले; नाशिक बाजार समितीत आवक 30 टक्क्यांवर

Nashik News : यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांवर आली आहे.
Vegetable Rate Hike
Vegetable Rate Hikeesakal

Nashik News : यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. नाशिक बाजार समितीत सद्यः स्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. (Due to scorching summer prices of fruits and vegetables have increased)

बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते पंचवीस टक्क्यांवर आली आहे. यामुळे दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत परिणामी वाढली आहे.

फळभाज्यामध्ये सध्या काकडी व घेवडा यांची सिझननुसार आवक ही घटली आहे, त्यामुळे या दोन्ही फळभाज्यांचे दर आवाक्यात आहे. मात्र, दुधी भोपळा, कारली, दोडका, गीलके आदी फळभाज्यांची आवक घटली आहे. बाजार समितीत गुरुवारी (ता. २) काकडी १५ ते लो ३५ रुपये किलो, दुधी भोपळा १५ ते २५ रुपये किलो, गिलके २५ ते ३० रुपये किलो.

कारले ३५ ते ४५ रुपये, दोडका ४० ते ४५ रुपये, कारले ४५ ते ५५ रुपये, शिमला मिरची २० ते ३० रुपये, हिरवी मिरची ३५ ते ४० रुपये असे दर मिळत आहेत. किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. (latest marathi news)

Vegetable Rate Hike
Nashik Onion Export : कांदा निर्यातीबाबत सुधारणा नक्की होतील : फडणवीस

बाजार समितीत गावठी कोथिंबीर १५ ते ६० रुपये, मेथी २० ते ३७ रुपये, शेपू १५ ते ३५ व कांदापात २५ ते ६० रुपये झुडीला भाव मिळत आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झुडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.

लसूण, लिंबू खातोय भाव

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डमध्ये मध्य प्रदेश व राजस्थान या भागातून सफेद लसूण आवक होत असतो. तसेच जिल्ह्यातून गावठी लसूण येत असतो. गुरुवारी तीस टन लसूण आवक झाला. यात मध्य प्रदेश, राजस्थान लसणाला ८० रुपये ते १६० मागणी व साईजनुसार भाव मिळाला, तर गावठी लसूनाला ८० ते १८० रुपये किलो भाव मिळाला.

लोकल बाजारात भरेकरी हा जवळपास चाळीस ते पन्नास रुपये अधिक भाव लावत विक्री करतात. यामुळे सद्यःस्थितीत लसूणदेखील भाव खात असून एक प्रकारे लसूण फोडणी देखील महागली असल्याचे दिसून येते. तसेच उन्हामुळे बाजारात लिंबांची मागणी प्रचंड वाढली आहे. किरकोळ बाजारात पाच रुपयांना एक, तर १५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे लिंबांची विक्री होत आहे.

Vegetable Rate Hike
Nashik City Transport : शहरात पुन्हा ‘टोईंग’ सुरू; बेशिस्तांना बसणार दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com