Nashik News : वर्षभरात पोलिसांकडून 222 गोवंशांची सुटका; पोलिस आयुक्तांचा दणका

Latest Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या अवैधरीत्या कत्तलीविरोधात पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
Police Rescued Cattles
Police Rescued Cattlesesakal
Updated on

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या अवैधरीत्या कत्तलीविरोधात पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार वर्षभरात २२२ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, वाहनांसह सुमारे दीड कोटींचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, गतवर्षीप्रमाणेच, यंदाही आयुक्तांनी अवैध कत्तलीविरोधात शहर पोलिस व गुन्हेशाखेला कारवाईत सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या असून, यामुळे अवैधरीत्या कत्तली करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com