

सिडको/नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीजवळ असलेल्या उड्डाणपुलावर गेल्या रविवारी (ता. १२) झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी राहुल साबळे (वय १७) याचा शुक्रवारी (ता. १७) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे आता अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. अपघातातील आणखी काही गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.