
Nashik E-Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला आणखी दहा ई-बस उपलब्ध झाल्या आहेत. यातून विभागाकडे उपलब्ध एकूण ई-बसची संख्या २४ झाली आहे. या ई-बस सप्तशृंग गड, त्र्यंबकेश्वर यासह शिर्डीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासह पर्यावरण संवर्धनाचा ध्यासदेखील बाळगता येईल. सिन्नरसाठीदेखील ई-बस उपलब्ध असेल. (E Bus to Trimbakeshwar and Shirdi by ST Corporation )