

नाशिक : वर्षाच्या प्रारंभीच पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे दोन्ही तालुक्यांतील जनतेत भीती पसरली होती. संबंधित दोन्ही तालुक्यांसह दिंडोरी व सुरगाणा तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी नागपूर येथील भूवैज्ञानिक विभागाचे अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हे अधिकारी तालुक्यांचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.